पक्षाबद्दल

Image Here

राष्ट्रवादी...

शरद पवार यांनी २५ मे १९९९ रोजी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ६, गुरुद्वारा राकबगंज रोड, दिल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय राजकारणाच्यादृष्टीनं हा ऐतिहासिक असा निर्णय होता. यामुळं देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण बदलणार होते. त्याचं प्रत्यंतर आज आपणा सर्वांना येत आहेच. स्थापनेची घोषणा करताना मा. श्री. पी. ए. संगमा आणि आणि मा. श्री. तारिक अन्वर यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणुन नियुक्ती करण्यात आली. पक्षाचं निवडणूक चिन्ह म्हणुन चरखा निश्चित करण्यात आला, पण निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली नाही. नंतर तीन वेगवेगळी चिन्हं निवडणूक आयोगाकडं पाठवल्यावर त्यातून घड्याळ या चिन्हाला पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणुन मान्यता मिळाली.

५ जुन १९९९ रोजी पक्षाची नोंदणी करण्यात आली. १० जुन १९९९ ला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तोच पक्षाचा स्थापना दिवस म्हणुन मानला जातो. त्यानंतर हजारो, लाखो कार्यकर्त्यांनी पक्षाला बळ देण्यासाठी हातभार लावला. कार्यकर्त्यांच्या याच तळमळीनं आणि जिद्दीनं आजपर्यंत पक्षाला यशाच्या शिखरावर पोहोचवलंय. 

२६ जून १९९९ ला दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुढच्या निवडणुकांमध्ये एकत्र आले.

पक्षाची तत्त्वे - 

  • कायद्यापुढं समानता, लोकशाही.
  • अधिकारांची विभागणी आणि समता या तत्वांवर भारताची एकता आणि सार्वभौमत्व जपणे आणि बळकट करणे.
  • स्पर्धा, स्वयंनिर्भरता, आणि व्यावसायिकांच्या पुढाकारानं भारताचा आर्थिक विकास घडवुन आणणं. 
  • समाजातील दुर्बल, मागासवर्गीय घटक, महिला आणि मुलं यांचं सबलीकरण करणं. 
  • लोकशाही पद्धतीनं पक्षाचं कामकाज चालवणं.