भाऊंविषयी

पार्श्वभूमी

                    काही माणसं लोकमान्य असतात तर काही माणसं राजमान्य … राजमान्य माणसं लोकमान्य असतातच असे नाही आणि लोकमान्य माणसं राजमान्य असतातच असे नाही. पण ज्यांच्या वाटयाला लोकमान्यताही आणि राजमान्यताही आली असे विशेष उदाहरण म्हणजे रहाटणी येथील विदयमान नगरसेवक कैलासभाऊ थोपटे …!

लोककल्याणाचा आणि लोकविकासाचा ध्यास धरून सर्वस्व झोकून देण्याच्या वृत्तीनेच हे मोठेपण त्यांच्या वाटयाला आले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एक पाय जनसमूहात तर दुसरा प्रगतीच्या दिशेने असावा लागतो. दोन्ही पाय जनसमुदायात राहिले तर जनसमुहाची प्रगती नाही. आणि दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेने उचलले तर त्यांचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही. मात्र ज्यांचा एक पाय कायम जनसमुहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेने उचललेला आहे असा लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक कैलास थोपटे यांची ओळख आहे.

प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन संघर्षातून सामाजिक कार्य उभे करणाऱ्या जिल्ह्यातील काही मोजक्या बहुआयामी नेतृत्वात कैलास थोपटे यांचा नामोल्लेख करावा लागेल. त्यामागील कारण देखील तसेच आहे, रहाटणी येथील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यतिमत्व म्हणजे कैलास थोपटे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर अवलंबून असे त्यामुळे साहजिकच आर्थिक परिस्थिती मोठी हलाखीची होती. आपल्या कुटुंबाला हातभार लागावा या उद्देशाने थोपटे यांनी इयत्ता आठवीतच शाळेला निरोप दिला आणि पी एम टी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम सुरु केले. परंतु वय लहान असल्याने त्या ठिकाणी हि त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. शेतीला काही तरी जोड धंदा असावा म्हणून सुरवातीला दुधाचा व्यवसाय सुरु केला. काळेवाडी येथे पत्र्याच्या खोलीत हॉटेल सुरु केले. सुरवातीला मिसळपाव नंतर जेवण असा हॉटेलचा प्रवास सुरु ठेवला कालांतराने हॉटेलला परवाना मिळाला आणि हॉटेलचा मोठा विस्तार झाला. आज काळेवाडी मध्ये सर्वात प्रसिद्ध हॉटेल म्हणून कुणाल हॉटेलची ओळख आहे. तसेच थोपटे यांचे रहाटणी येथे भव्य थोपटे लॉन्स मंगल कार्यालय आहे.

आपण देखील समाजासाठी काही तरी करावे अशी जिद्द मनाशी बाळगून थोपटे यांनी समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. सामाजिक कार्याला राजकीय किनार लागतेच हे काही खोटे नाही. सामाजिक कार्य करत असताना सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडली गेली. सर्वसामान्यांचे कैवारी, आदर्श व्यतिमत्व, मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक प्रश्नांची जान असणारा व्यक्ती म्हणून कैलास थोपटे यांची प्रतिमा तयार झाली. अखेर नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि नागरिकांनी हि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा स्वीकार केला. नागरी समस्यांसाठी अहोरात्र झगडणे, प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करणे, प्रभागातील एखादया समस्येविषयी थोरमोठयांना विश्वासात घेऊन समस्या सोडविणे अशा त्यांच्या कार्य पद्धतीमुळे व मनमिळाऊ स्वभावामुळे नागरिकांनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिले.

खऱ्या अर्थाने राजकारणात उत्तम संघटन आवश्यक असते. कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना उभे करण्यासाठी त्या क्षमतेचे व योग्यतेचे नेतृत्व आवश्यक असते. ते नेतृत्व नगरसेवक कैलास थोपटे यांनी परिसराला दिले. मानसन्मानाचा कुठलाही बडेजाव कधी बाळगला नाही. सर्वसामान्य माणसात सामान्य होऊन मिसळण्याचे त्यांचे नैसर्गिक वागणे त्यांचातील आपुलकीची साक्ष देणारा आहे. माणूस विचाराने आणि संस्काराने घडतो. हि व्याख्या येथे लागू होते. तरुणाईचा आक्ष्वासक चेहरा आणि सर्वसामान्यांचा विश्वास, त्यांची ओळख, विकासकामातील त्यांची झेप दर्शविते. संघर्ष जेवढा मोठा असतो, विजयाची उंची तेवढीच मोठी असते. थोपटे यांच्या वाटयाला आलेला संघर्ष हाच त्यांची कर्तुत्व उंची वाढविणारा ठरला आहे. कैलास थोपटे यांनी ज्या क्षेत्रात काम करायचे ते पुरते झोकून देऊन अभ्यासपूर्वक आणि नियोजनबध्द या त्यांच्या शैलीनेच यश त्यांच्या ओंजळीने विसावा घेत आहे....
-- कुणाल कैलासभाऊ थोपटे...

कारकीर्द

  • करिअर
  • सामाजिक कार्य
  • Image Here
    • पी एम टी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम सुरु केले
    • शेतीला काही तरी जोड धंदा असावा म्हणून सुरवातीला दुधाचा व्यवसाय सुरु केला
    • काळेवाडी येथे पत्र्याच्या खोलीत हॉटेल सुरु केले
    • आज काळेवाडी मध्ये सर्वात प्रसिद्ध हॉटेल म्हणून कुणाल हॉटेलची ओळख आहे
    • भव्य थोपटे लॉन्स मंगल कार्यालय
    • विद्यमान नगरसेवक
  • Image Here
    • नागरी समस्यांसाठी अहोरात्र झगडणे,प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करणे
    • अनाथ मुलांना खाऊ वाटप,धान्य वाटप
    • मोफत आरोग्य तपासणी
    • प्रभागातील एखादया समस्येविषयी थोरमोठयांना विश्वासात घेऊन समस्या सोडविणे
    • त्यांच्या कार्य पद्धतीमुळे व मनमिळाऊ स्वभावामुळे नागरिकांनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिले.
  • सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
  • Image Here
    • मुला - मुलींसाठी रास दांडिया चे दरवर्षी आयोजन
    • खास महिलांच्या आग्रहास्तव "खेळ पैठणीचा" कार्यक्रमाचे आयोजन
    • सर्व धर्मीय महापुरुष,संतांची जयंती,पुण्यतिथी निमित्ताने लोकोपयोगी उपक्रम राबविणे.
    • मुलांना वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगून वृक्षारोपण केले जाते.
    • शिवजयंती निमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनीनी काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत केले जाते.
  • खेळ आणि क्लब :
  • Image Here
    • विविध खेळांचे आयोजन
    • शालेय मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
    • महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद
    • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या
    • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
    • रयत शिक्षण संस्था ,सातारा