आपलं नेतृत्व

पार्श्वभूमी

शरद पवार यांनी २५ मे १९९९ रोजी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ६, गुरुद्वारा राकबगंज रोड, दिल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय राजकारणाच्यादृष्टीनं हा ऐतिहासिक असा निर्णय होता. यामुळं देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण बदलणार होते. त्याचं प्रत्यंतर आज आपणा सर्वांना येत आहेच. स्थापनेची घोषणा करताना मा. श्री. पी. ए. संगमा आणि आणि मा. श्री. तारिक अन्वर यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणुन नियुक्ती करण्यात आली. पक्षाचं निवडणूक चिन्ह म्हणुन चरखा निश्चित करण्यात आला, पण निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली नाही. नंतर तीन वेगवेगळी चिन्हं निवडणूक आयोगाकडं पाठवल्यावर त्यातून घड्याळ या चिन्हाला पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणुन मान्यता मिळाली.

५ जुन १९९९ रोजी पक्षाची नोंदणी करण्यात आली. १० जुन १९९९ ला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तोच पक्षाचा स्थापना दिवस म्हणुन मानला जातो. त्यानंतर हजारो, लाखो कार्यकर्त्यांनी पक्षाला बळ देण्यासाठी हातभार लावला. कार्यकर्त्यांच्या याच तळमळीनं आणि जिद्दीनं आजपर्यंत पक्षाला यशाच्या शिखरावर पोहोचवलंय.

२६ जून १९९९ ला दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुढच्या निवडणुकांमध्ये एकत्र आले.

कारकीर्द

  • 1967-1980
    काँग्रेस सचिव
  • 1981-2000
  • Image Here
    • महाराष्ट्र विधानसभा सदस्य
    • महाराष्ट्र काँग्रेस सचिव
    • महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेश समितीचे सरचिटणीस
    • 1978 साली जनता पक्षाबरोबर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार स्थापन
    • महाराष्टाचे सर्वात तरुण मुख्यमंत्री
  • Image Here
    • महाराष्ट्र विरोधी विधानसभेची नेते
    • केंद्रीय कॅबिनेट मंत्री, संरक्षण
    • सदस्य(विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती)
    • विरोधी लोकसभेचे नेते
    • सदस्य(परराष्ट्र व्यवहार समिती आणि उपसमिती-II)
    • सदस्य(सल्लागार समिती, मंत्रालय मानव संसाधन विकास)
    • सदस्य(कृषी समिती,सामान्य हेतू समिती,नीतिशास्त्र समिती)
  • सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष
  • Image Here
    • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.
    • नेहरू सेंटर, मुंबई
    • विद्या प्रतिष्ठान बारामती,पुणे
    • कृषी विकास ट्रस्ट, बारामती
    • वाय . बी.चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई
    • रयत शिक्षण संस्था ,सातारा
  • खेळ आणि क्लब अध्यक्ष:
  • Image Here
    • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना
    • गरवारे क्लब हाऊस
    • महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद
    • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या
    • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
    • रयत शिक्षण संस्था ,सातारा