Name Search
Image Here
भाऊंविषयी...

श्री कैलासभाऊ गबाजी थोपटे

काही माणसं लोकमान्य असतात तर काही माणसं राजमान्य … राजमान्य माणसं लोकमान्य असतातच असे नाही आणि लोकमान्य माणसं राजमान्य असतातच असे नाही. पण ज्यांच्या वाटयाला लोकमान्यताही आणि राजमान्यताही आली असे विशेष उदाहरण म्हणजे रहाटणी येथील विदयमान नगरसेवक कैलासभाऊ थोपटे …! लोककल्याणाचा आणि लोकविकासाचा ध्यास धरून सर्वस्व झोकून देण्याच्या वृत्तीनेच हे मोठेपण त्यांच्या वाटयाला आले आहे . लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एक पाय जनसमूहात तर दुसरा प्रगतीच्या दिशेने असावा लागतो. दोन्ही पाय जनसमुदायात राहिले तर जनसमुहाची प्रगती नाही. आणि दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेने उचलले तर त्यांचा जनसमूहाशी संपर्क उरत नाही.

अधिक वाचा
Image Here
About our MIssion

Democracy Mission

Harvard University’s Institute of Politics (IOP), located at the John F. Kennedy School of Government, was established in 1966 as a memorial to President Kennedy. The IOP’s mission is to unite and engage students, particularly undergraduates, with academics, politicians, activists, and policymakers on a non-partisan basis to inspire them to enter careers in politics and public service. The Institute strives to promote greater understanding and cooperation between the academic world and the world of politics and public affairs.

See More
Image Here
About our Vision

Our Democracy Vision

Politics and Vision: Continuity and Innovation in Western Political Thought is a work of political theory by Princeton Emeritus Professor Sheldon S. Wolin. Part One, consisting of ten chapters and first published in 1960, distinguishes political philosophy from philosophy in general and traces political philosophy from its Platonic origins to modern day Part Two, consisting of seven chapters and published (along with Part One) in a 2004 expanded edition, traces the development of political thought from Marx, Nietzsche, and others up to the late 20th century.

See More
Image Here
नेता जनसामान्यांचा

समाजासाठी आपण देखील काही तरी करावे अशी जिद्द मनाशी बाळगून कैलास थोपटे यांनी समाजसेवेचे कार्य हाती घेतले. सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करणे, निःस्वार्थ भावना, सामाजिक जबाबदारी, समर्पित वृत्ती या उद्देशाने त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली, हे कार्य करीत असताना सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडली गेली. सर्वसामान्यांचे कैवारी ,आदर्श व्यक्तिमत्व, मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक प्रश्नांची जान असणारा व्यक्ती म्हणून कैलास थोपटे यांची प्रतिमा तयार झाली. नागरी समस्यांसाठी अहोरात्र झगडणे, प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करणे, प्रभागातील समस्येविषयी थोरमोठयांना विश्वासात घेऊन समस्या सोडविणे अशा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे व मनमिळाऊ स्वभावामुळे नागरिकांनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिले.

अभ्यासू व्यक्तिमत्व

कैलास थोपटे यांनी ज्या क्षेत्रात काम करायचे ते पुरते झोकून देऊन केले. संघर्ष जेवढा मोठा असतो, विजयाची उंची तेवढीच मोठी असते. थोपटे यांच्या वाटयाला आलेला संघर्ष हाच त्यांची कर्तुत्व उंची वाढविणारा ठरला आहे. अशा या त्यांच्या अभ्यासपूर्वक आणि नियोजनबध्द शैलीनेच यश त्यांच्या ओंजळीने विसावा घेत आहे. कैलास थोपटे यांनी विविध उपक्रम राबविले. राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक पदे भूषविली. पण पदामुळे त्यांची, त्यांच्यामुळे पदाचीच शोभा वाढली. आपले अतुलनीय धैर्य आणि मनःशक्ती यांच्या बळावर त्यांनी आव्हानांचे परिवर्तन संधीमध्ये केले. पायापासून आरंभ झालेली पण कळसापर्यंत पोहोचलेली त्यांची वाटचाल एक प्रेरणादायी नेतृत्व कसे आकाराला आले याची साक्षीदार आहे.

आपला माणूस

सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हिताविषयी ते किती जागरुक आहेत, हे अनाथ मुलांना धान्यवाटप, मोफत आरोग्य तपासणी, कचराकुंडीमुक्त प्रभाग, विकासकामांचे अशा त्यांच्या विविध उपक्रमामधून दिसून येते. कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना उभे करण्यासाठी त्या क्षमतेचे व योग्यतेचे नेतृत्व आवश्यक असते. ते नेतृत्व नगरसेवक कैलास थोपटे यांनी परिसराला दिले. सर्वसामान्य माणसात सामान्य होऊन मिसळणे, नागरी समस्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणे, लोककल्याणकारी मुल्य पाळणाऱ्या तत्वाने राहणे व तत्वानेच जगणे, लोकहितासाठी त्यागाची अविरत भूमिका ठेवणे, कार्यकर्त्यांच्या मागे पर्वतासारखे उभे राहणे, असे त्यांचे व्यक्तिमत्व आपुलकीची साक्ष देणारे आहे.

आम्ही केलेली कामे

What We Do

  • विकासकामे

    दरवर्षी प्रभागातील लोकांसाठी आरोग्य शिबीर.
    नियमितपणे रक्तदान शिबीरचे आयोजन .
    महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित पायाभूत ४० कोटी रुपये खर्चाच्या विकास योजना.

  • विकासकामे

    नेत्ररोग तपासणीचे वेगळे शिबीर.
    खास महिलांच्या आग्रहास्तव "खेळ पैठणीचा" कार्यक्रमाचे आयोजन .
    ६५% प्रभागामध्ये जिथे गरज होती अशा सर्व ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले.

  • विकासकामे

    अंधश्रद्धा निर्मुलनवर सतत विविध जनजगृतीपर कार्यक्रम.
    प्लस पोलिओ लसीकरण.
    लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार .
    सर्व धर्मीय महापुरुष,संतांची जयंती,पुण्यतिथी निमित्ताने लोकोपयोगी उपक्रम राबविणे.

  • विद्यार्थ्यासाठी

    अनाथ मुलांना दरवर्षी खाऊचे वाटप.
    गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
    १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी नियमितपणे शाळांमध्ये खाऊ वाटप .

  • विद्यार्थ्यासाठी

    विविध खेळांचे आयोजन .
    मुला - मुलींसाठी रास दांडिया चे दरवर्षी आयोजन.
    शिवजयंती निमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनीनी काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत केले जाते.

  • विद्यार्थ्यासाठी

    शालेय मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
    लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार .
    मुलांना वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगून वृक्षारोपण केले जाते.

आपलं नेतृत्व

Image Here
मा. श्री. शरद पवारसाहेब
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष
मा. श्री. शरद पवारसाहेब

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष

Image Here
मा . श्री . अजितदादा पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रमुख
मा . श्री . अजितदादा पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रमुख

Count Down

Upcoming Elections

Days
Hours
Minutes
Seconds
Media Conference

News & Press Release

Image here
सारथी...

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने रहिवासियांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या विविध विभागाविषयी माहिती देणारे सारथी आप्लिकेशन.यामध्ये नागरिकांना करसंकलन, पाणीपुरवठा,नगररचना,तसेच महानगर पालिकेच्या हद्दीतील रुग्णालये,पोलिस स्टेशन, हॉटेल, रक्तपेढी अशा अनेक गोष्टींची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

डाउनलोड करा
Image here
नेताजी...

अनेकवेळा आपल्याला आपण निवडून दिलेल्या लोकप्रतीनिधीविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचे आसते. नेताजी आप्लिकेशन हे लोकप्रतीनिधीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या आधारे त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देते. आपल्याला उमेदवाराला संपर्क करण्याची सुविधा देखील यामध्ये करण्यात आली आहे

डाउनलोड करा